आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगेश देसाई यांची प्रमुख विश्वस्तपदी फेरनिवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 5) संस्थान कमिटीची मासिक सभा पुणे कार्यालयात पार पडली. या सभेत 2022-23 वर्षाकरिता आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विश्वस्त अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख, अॅड. विकास ढगेपाटील उपस्थित होते.
देसाई हे पुण्यातील व्यावसायिक असून देसाई बंधू आंबेवाले या पेढीचे ते मालक आहेत. त्यांनी 2021-22 या वर्षीही प्रमुख विश्वस्तपदाची तसेच दोन वेळा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.