Alandi traffic action | धोकादायक पार्किंगचा फटका! आळंदीत रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – आळंदी नगरपालिका चौकातील इंद्रायणीच्या जुन्या पुलावर वाहतुकीस अडथळा ठरेल, अशा पद्धतीने रस्त्यावर रिक्षा धोकादायक पद्धतीने उभी केल्याबद्दल सात रिक्षाचालकांवर आळंदी पोलिस ठाण्यातील वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली.राजीव बालाजी गरुड (वय 43, रा. वडगाव शेरी, ता. हवेली), रमाकांत मारुती गायकवाड (वय 42, रा. ठाकर वस्ती, चहोली), पंकज महादेव डांगे (वय 32, रा. धानोरे, ता. खेड), विवेकानंद श्रीशैल गायकवाड
(वय 38, रा. काळेवाडी,(पिंपरी), तानाजी बाबूराव थोटे (वय 42, रा. आळंदी), शुभम अजय चौधरी (वय 27, रा. वडगाव घेनंद, ता. खेड), नामदेव भारत येडवे (वय 39, दिघी, ता. हवेली), असे गुन्हे दाखल झालेल्या रिक्षाचालकांचे नाव आहे. याबाबत फिर्याद आळंदी वाहतूक पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार निवृत्ती डामसे, वाहतूक विभागातील पोलीस शिपाई वनिता उभे, प्रमोद हिरळकर, सुरेश मुंडे, अपर्णा तापकीर, सुनीता कवठे, वंदना गव्हाणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे.





