IKKA OTT Release : अक्षय खन्ना आणि सनी देओल तब्बल 29 वर्षानंतर दिसणार एकत्र
IKKA OTT Release : सनी देओल दिसणार वकिलाच्या भूमिकेत

IKKA OTT Release : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाने रहमान डकैतने खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या भुमिकेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. या चित्रपटाच्या यशानंतर अक्षय खन्ना आता ‘इक्का’ चित्रपटात दिसणार आहे. (IKKA OTT Release)
‘इक्का’ या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत आहे तर अक्षय खन्ना यामधून पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलरही रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार जवळपास 29 वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. यापूर्वी या दोन्ही स्टार्सनी 1997 मध्ये स्क्रीन शेअरकेली होती. (IKKA OTT Release)
दोघांचा ‘बॉर्डर’ चित्रपट १३ जून १९९७ रोजी रिलीज झाला होता. यामध्ये अक्षय खन्ना यांनी धर्मवीर आणि सनी देओल यांनी मेजर कुलदीप सिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पूजा भट्ट, शरबानी मुखर्जी, राखी गुलजार, सुदेश बेरी, पुनीत इस्सर, कुलभूषण खरबंदा आणि जॅकी श्रॉफ सारखे कलाकारही होते. या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवडीने पाहतात. (IKKA OTT Release)
‘इक्का’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, यात सनी देओल वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. एका वकिलाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. हा कोर्टरूम ड्रामा चित्रपट १० जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. चित्रपटात त्यांच्यासोबत अक्षय खन्ना यांच्याशिवाय दिया मिर्झा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे. (IKKA OTT Release)
हेही वाचा:





