Akshaye khanna : २०२५ च्या सुरुवातीला विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर लोकांच्या हृदयावरही विशेष छाप सोडली. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित होती, ज्यांची भूमिका विकी कौशलने साकारली होती. चित्रपटाच्या कथेपासून ते सर्वांच्या अभिनयापर्यंत आणि चित्रपटातील कलाकारांपर्यंत, प्रत्येक गोष्टीचे खूप कौतुक झाले. मात्र. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला व्यक्ती होता अक्षय खन्ना ज्याने चित्रपटात औरंगजेबाची भूमिका केली होती. त्याचे रूप इतके अद्भुत होते की लोकांनी त्याला सुरुवातीला ओळखलेच नाही. ‘छावा’ मध्ये औरंगजेबची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता प्रशांत वर्मा सिनेमॅटिक यूनिव्हर्सचा पहिला महिला सुपरहिरो सिनेमा ‘महाकाली’ द्वारे तेलगू पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमात अक्षयला विशेष भूमिका मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे. अक्षय खन्ना ‘महाकाली’ सिनेमात काम करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सिनेमाच्या टीमच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली की, सिनेमात अक्षय एक विशेष भूमिका साकारत आहे. मात्र, तो मोठा खलनायक आहे की हिरो आहे? हे निश्चित झालेले नाही. सिनेमाबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली आहे. पण सिनेमाबद्दल चर्चांनी तुफान जोर धरला आहे. ‘महाकाली अद्याप प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. तसेच ‘महाकाली’ सिनेमानंतर अभिनेता ‘अधीरा’ सिनेमात दिसणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्याचं भगवान इंद्रावर आधारित एक पात्र असेल. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.