‘स्त्री 2’ चित्रपटातील अक्षय कुमारचा ‘कॅमिओ रोल’ प्रेक्षकांच्या पसंतीत

निर्माता दिनेश विजन यांचा हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स चित्रपट ‘स्त्री 2’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या 6 वर्षांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.
अशात हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाला असून चित्रपटातील दृश्ये, कलाकारांच्या कॉमिक टायमिंगसह, त्यातील कॅमिओ देखील चाहत्यांच्या मनाला आनंदित करत आहे.
‘स्त्री 2’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. अशात आता ‘स्त्री 2’ मध्ये अक्षय कुमारनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याने चित्रपटात अशाच एका व्यक्तिरेखेचा कॅमिओ केला आहे, जो चित्रपटातील मुख्य प्लॉट ट्विस्ट आहे.
End Credit Scene 😱😱…
“AKSHAY KUMAR TO BE THANOS OF HORROR UNIVERSE”💥💥💥
FUCKKKKKKK BC MASSSS🔥🔥#Stree2SarkateKaAatank #AkshayKumar𓃵 pic.twitter.com/p4DN5LESnn— 𝙂𝙪𝙧𝙪 (@kabirrr07) August 14, 2024
अक्षय कुमारचा कॅमिओ व्हायरल झाला होता. ‘स्त्री 2’ मध्ये ट्विस्ट जोडल्यानंतर अक्षय कुमार पुन्हा चित्रपटाच्या शेवटच्या क्रेडिट सीनमध्ये दिसत आहे. येथे तो सरकटाच्या भूमिकेत दिसत आहे.
‘स्त्री’पासून सुरू झालेल्या हॉरर-कॉमेडीच्या विश्वात अक्षय काहीतरी मोठं करायला आला आहे, हे यावरून स्पष्ट होत. ‘स्त्री 2’ मधील कॅमिओपेक्षा त्याचे पात्र मोठे असल्याचे मानले जात आहे. पण बॉलीवूडच्या खिलाडीचा छोटा कॅमिओही प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे अक्षयच्या चित्रपटातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
The KING Akshay Kumar in #Stree2Review & enter Horror Universe.#AkshayKumar #shrddhakapoor #viralpost pic.twitter.com/tpsRSNTaLw
— 𝘐𝘵’𝘴 𝘔𝘪𝘤𝘬𝘺 (@ItsMicky14) August 15, 2024
युजर्सनी अक्षय कुमारला हॉरर कॉमेडी विश्वाचा ‘थॅनोस’ म्हटले आहे. थानोस हा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सुपरव्हिलन आहे, ज्याने अर्धे जग क्षणार्धात गायब केले. ‘स्त्री 2’ च्या शेवटी, निर्मात्यांनी अक्षयला किलर थँक्स देखील म्हटले आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ या चित्रपटाची ‘स्त्री 2’सोबत टक्कर आहे.
या अभिनेत्याची अधिक चर्चा त्याच्या कॅमिओमुळे होत आहे. अक्षयला या चित्रपटात पाहिल्यानंतर चाहत्यांना नक्कीच मोठे सरप्राईज मिळाले आहे. दिग्दर्शक अमर कौशिकच्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनीही काम केले आहे.





