फोर्ब्स मासिकाकडून दरवर्षी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली जाते. यंदाच्या वर्षीही फोर्ब्सने जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षय हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर, वर्ष भरातील अक्षयची एकूण कमाई ही जवळपास 486 कोटी आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर “द रॉक’ ड्वेन जॉन्सनचा समावेश आहे. त्याची एकूण कमाई ही 639 कोटी आहे. फोर्ब्सच्या यादीत सहभागी झालेला अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड कलाकार आहे. अक्षय कुमारचा “मिशन मंगल’ हा चित्रपट नुकताच प्रसदर्शित झाला. या चित्रपटाने 125 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
अक्षय बॉलिवूड़मध्येही सर्वाधिक कमाई करणारा आणि मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. येत्या वर्षभरात अक्षयचे “सूर्यवंशी’, “गूड न्यूज’, “लक्ष्मी बॉम्ब’, “बच्चन पांड्ये’ आणि “हाऊसफुल्ल 4′ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.