अक्षय केळकरची ‘रमा’ आली समोर; खास व्हिडिओ केला शेअर

Akshay Kelkar | बिग बॉस सीजन ४चा विजेता अक्षय केळकर बराच चर्चेत राहिला. अलिकडेच तो कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अक्षयने गर्लफ्रेंड रमासोबतचे एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिग बॉस मराठीमध्ये असतानाच त्याने त्याची गर्लफ्रेंड रमाचा खुलासा केला होता.
मात्र तिच्याबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. आता अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या नात्याला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. अनेक मुलाखतींदरम्यान अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडविषयी भाष्य केलं होतं. पण आता त्याने तिच्यासोबतचा व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओवर अक्षयने दिलेल्या कॅप्शननेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले. “तर ही माझी रमा…आम्हाला 10 वर्ष पूर्ण होतायत … म्हंटल एक दिवस आधीच सांगाव .. म्हणून … बापरे, फाइनली सांगतोय मी … पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही…”, असे अक्षयने म्हंटले आहे.
अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तो आणि रमा टेरेसवर निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. तसेच अक्षय तिच्यासाठी मोगऱ्याची फुलंही घेऊन येतो. एक रोमँटीक गाणंही लावलं आहे.
कोण आहे अक्षयची रमा?
अक्षयची रमा म्हणजेच साधना काकटकर एक गायिका आहे. अक्षय आणि समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’ या गाण्याला तिनेच आवाज दिला होता. ती वेगवेगळ्या संगीत अल्बमला आवाज देते.
हेही वाचा:
“जरा दम तर काढा, त्यांनी पंतप्रधान व्हायला हवं”; कृषिमंत्री ॲड. कोकाटेंचा भुजबळांना टोला





