Satara: ‘अकोला पॅटर्न’ महाराष्ट्रात राबवणार-सुजात आंबेडकर
Satara महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिक्षक मतदारसंघातून डॉ. इकबाल चंदुलाल शेख, तर पदवीधर मतदारसंघातून प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Satara: महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेवर आणि शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील एकही शाळा बंद पडू द्यायची नाही. अकोला जिल्ह्यात राबवलेला शैक्षणिक पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवायचा आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी सातार्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिक्षक मतदारसंघातून डॉ. इकबाल चंदुलाल शेख, तर पदवीधर मतदारसंघातून प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दोन्ही उमेदवारांना शिक्षण क्षेत्राचा सखोल अनुभव असून, शिक्षणव्यवस्थेतील प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने संधी दिली असल्याचे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले. प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात अध्यापन करताना विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रयोगांच्या माध्यमातून मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
‘अकोला पॅटर्न’ राज्यभर राबवण्याचा निर्धार!
शिक्षणव्यवस्थेतील बदलांवर भाष्य करताना सुजात आंबेडकर यांनी अकोला जिल्हा परिषदेतील वंचित बहुजन आघाडीच्या कामाचा दाखला दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत नवीन 80 शाळा सुरू करण्यात आल्या असून, एकही शाळा बंद पडू न देण्याची भूमिका घेण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबतच पोलीस भरती, वनविभाग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करता यावी, यासाठी व्यायामशाळा आणि अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
शिक्षकांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले!
शिक्षक भरतीतील अडचणी, वेतनाचे प्रश्न, सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन आणि शिक्षण सेवक पद्धतीमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधत सुजात आंबेडकर यांनी सरकारच्या शिक्षणविषयक धोरणांवर टीका केली.





