Satara: नाना पाटेकर यांना सातारच्या रंगकर्मींच्यावतीने श्रद्धांजली
Satara वेलकम, अबतक छपन्न, अंकुश, नटसम्राट, पुरुष या अजरामर कलाकृती त्यांनी अभिनित केल्या. प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या विषयी आदर आणि प्रेम होते आणि सदैव राहील, असे मत अभिनेते बाळकृष्ण शिंदे यांनी व्यक्त केले.

Satara: येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित नाट्य परिषदेच्या सातारा केंद्रावरील एकांकिका स्पर्धा सुरू होण्याआधी उपस्थित सर्व रंगकामींनी व मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जयेंद्र चव्हाण म्हणाले, नाना पाटेकर हे जसे उत्तम अभिनेते होते तसेच त्यांचे समाजकार्य सुद्धा वाखाणण्याजोग होते. त्यांच्या अभिनयाची आणि समाजकार्याची दखल नेहमी घेतली जाईल. नाना पाटेकरांनी हिंदीतल्या व्यवसायिक सिनेमात ज्या प्रभावीपणे त्यांनी वेगवेगळी पात्र साकारली ती लाजवाबच होती.
वेलकम, अबतक छपन्न, अंकुश, नटसम्राट, पुरुष या अजरामर कलाकृती त्यांनी अभिनित केल्या. प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या विषयी आदर आणि प्रेम होते आणि सदैव राहील, असे मत अभिनेते बाळकृष्ण शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी अमित बैचे, महेंद्र तेरेदेसाई, राजीव मुळ्ये, संतोष पाटील, आनंद कदम, नीलेश माने, कुलदीप मोहिते, अमित देशमुख, जमीर आतार, शशांक वाडेकर, संतोष वेल्हाळ, धनश्री भीडे, प्रज्ञा चव्हाण, धैर्यशील उत्तेकर, हेमंत खळतकर, चैतन्य पाटेकर, अशोक शेलार, महेश चव्हाण, देवांग सपकाळ आदी रंगकर्मी उपस्थित होते.





