साऊथ सुपरस्टार नागार्जुनने मागितली चाहत्यांची ‘माफी’

Entertainment । साऊथ सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीचे चाहता वर्ग खूप मोठा आहे त्याने साऊथ चित्रपटांप्रमाणेच हिंदी चित्रपटातून आपली वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे.
त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक दिसतात. अशातच त्याची एक झलक पाहण्यासाठी एक चाहता एअरपोर्टवर जेव्हा नागार्जुनला पाहण्यासाठी पुढे आला त्यावेली अभिनेत्याच्या बॉडीगार्डने त्याला उद्धटपणा वागणूक दिली या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
Where has humanity gone? #nagarjuna pic.twitter.com/qnPjJngIxM
— Viral Bhayani (@viralbhayani77) June 23, 2024
नुकताच नागार्जुन एयरपोर्ट स्पॉट झाला. तो डैशिंग अंदाज चालत होता याच दरम्यान, एका वृद्ध चाहत्याने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी अभिनेत्याच्या बॉडीगार्ड वृद्ध चाहत्याला पकडून साईडला केले. यावेळी तो पडता पडता वाचला. तिथे उभ्या इतर लोकांनी त्या वृद्ध चाहत्याला पकडले.
अभिनेत्याकडून या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्या अभिनेत्याने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
प्रकरण वाढत असल्याचे पाहून नागार्जुनने नंतर माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. हे शेअर करण्यासोबतच त्याने लिहिले की, ‘मला नुकतीच याची माहिती मिळाली आहे. असे घडायला नको होते. मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असे घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेईन.’
दरम्यान, नागार्जुनच्या व्यावसायिक आघाडीबद्दल बोललो तर, अभिनेता शेवटचा ‘बंगाराजू’ आणि ‘द घोस्ट’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता.





