इस्लामाबाद: पाकिस्तानच्या लारकाना शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर प्रकरणी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही या घटनेबाबत ट्विट केले.
तरूण आणि निरागस अशा नम्रिताच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे मला खूपच दु:ख झाले आहे. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि तिच्या मारेकऱ्यांना नक्कीच शासन केले जाईल असा मला विश्वास आहे. कोणत्याही विचारसरणीचा असला, तरी प्रत्येक पाकिस्तानी हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. देव तिच्या आत्म्यास शांती देवो, असे अख्तरने ट्विट केले आहे.