Pune News | आळंदीत उद्या अखंड हरिनाम सप्ताह

आळंदी, – श्रीक्षेत्र आळंदी येथे 729 संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री गुरुवर्य विठ्ठलबाबा देशमुख यांच्या चैतनामयी सानिध्यात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे .
सालाबाद प्रमाणे संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त या सप्ताहमध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा व विष्णू नाम सहस्त्र सकाळी 8 ते 12 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 1 ते 3 संगीत भजन व पारायण 5 ते 6 हरिपाठ रात्री 6 ते 8 हरिकीर्तन असून गुरुवारी (दि. 21) कार्तिक वद्य गुरुवारपासून हा सप्ताह प्रारंभ होत आहे.
गुरुवारी (दि. 21) शांती ब्रह्म मारुतीबाबा कुरेकर यांचे कीर्तन सेवा होणार आहे. शुक्रवारी (दि. 22) ज्ञानेश्वर माऊली कुर्हाडे, शनिवारी (दि. 23) नरहरी महाराज सांगळे, रविवारी (दि. 24) ज्ञानेश्वर माऊली करंजीकर, सोमवारी (दि. 25) ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांचे 6 ते 8 कीर्तन होणार आहे.
मंगळवारी (दि. 26) साधक हृदय डॉ. नारायण महाराज जाधव पद्मभूषण पुरस्कार्तेकर्त यांचे हरिकीर्तन तर बुधवारी (दि. 27) विनोदचार्य पांडुरंग महाराज गिरी यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. 28) सद्गुरू विठ्ठलबाबा देशमुख यांचे शिष्य श्रीनिवास महाराज घुगे यांचे काल्याचे किर्तनांतर महाप्रसाद होणार आहे.





