पुणेः बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून आष्टीचे आमदार सुरेश धस हे आक्रमक आहेत. त्यांनी हे हत्या प्रकरण लावून धरले आहे. तसेच धस हे धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना दिसत आहे. आता धस यांनी २०१९ ते २०२४ या काळात बीड जिल्हा नियोजन विभागांच्या कामांत मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे या काळात झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या चौकशीची मागणी धस हे बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार होते. मात्र, अजित पवारांकडून भेटीसाठी वेळ न मिळाल्याने धस हे बीडला परतले आहेत. यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार सुरेश धस यांना भेटणं टाळलं असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी २०२३-२०४ या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जिल्हा नियोजन विभागाच्या कामात बीडमध्ये झाला असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. तसेच धस यांच्या वतीने या अगोदरच ७२ कोटी रुपयांची बोगस बिले पुरावा म्हणून अजित पवारांना देण्यात आली आहेत. २०१९ ते २०२३ या काळात भष्ट्राचारः आमदार सुरेश धस धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना म्हणजेच २०१९ ते २०२३ या काळात सर्वात जास्त भष्ट्राचार झाला आहे. म्हणून त्या काळतील कामांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे धस यांचे म्हणणे आहे. यासाठी अजित पवार यांना भेटून पत्र देऊन या संदर्भातील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवार यांच्या वतीने सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही. अजित पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष पालकममंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांतील चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, आमदार सुरेश धस यांच्या मते ज्यावेळी धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते, त्याकाळात (२०१९ ते २०२३) मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाला असल्याचे धस यांचे म्हणणे आहे. यामुळे आता पालकमंत्री अजित पवार यावर कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.