अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; वाचा नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Statment| उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या खास शैलीमुळे ओळखले जातात. मात्र अनेकदा स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होते. काही दिवसांपूर्वी बारामतीच्या प्रचारासभेतील कार्यक्रमात ‘आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल’ असे विधान केले होते.
अजित पवार यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण थेट निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या विधानाची दखल घेतली आहे. तसेच जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना अवहाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर निशाणा साधला होता.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार? Ajit Pawar Statment|
अजित पवार म्हणाले होते की, ‘आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल, तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणे कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल’ असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही त्यांच्यावर निशाणा साधत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी या विधानावर स्पष्टीकरणही दिले होते. “कोणत्याही गोष्टीत ध ‘चा’ मा करू नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकिल आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती,” असे त्यावर अजित पवार म्हणाले होते.
दरम्यान, अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Ajit Pawar Statment|
हेही वाचा:
पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील 102 जागांवर 60.03% मतदान, महाराष्ट्रासह कुठे आणि किती मतदान झाले पहा





