First Phase Voting : देशात लोकसभा निवडणुक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर सायंकाळी 7 वाजेपर्यंत चांगले मतदान झाले. महाराष्ट्रात 55.29 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के आणि त्रिपुरामध्ये 79.90 टक्के मतदान झाले. (Lok Sabha Election 2024)
इतर राज्यांत कुठे किती टक्के मतदान झाले?
भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 8.4 कोटी तर महिला मतदारांची संख्या 8.23 कोटी आहे. प्रथमच मतदारांची संख्या 35.67 लाख आहे. 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. 1.87 लाख मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
As per ECI, Tripura recorded 79.90% voter turnout till 7pm, in the first phase of the Lok Sabha elections which saw polling in 21 States and UTs pic.twitter.com/2E0UgIjfpb
— ANI (@ANI) April 19, 2024
सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान –
त्रिपुरा: 79.90%
अंदमान निकोबार: 56.87%
अरुणाचल प्रदेश: 65.46%
आसाम: 71.38%
बिहार: 47.49%
छत्तीसगड: 63.41%
जम्मू आणि काश्मीर: 65.08%
लक्षद्वीप: 59.02%
मध्य प्रदेश: 63.33%
महाराष्ट्र: 55.29%
मणिपूर: 68.62%
मेघालय: 70.26%
मिझोराम: 54.18%
नागालँड: 56.77%
पुद्दुचेरी: 73.25%
राजस्थान: 50.95%
सिक्कीम: 68.06%
तामिळनाडू: 62.19%
उत्तर प्रदेश: 57.61%
उत्तराखंड: 53.64%
पश्चिम बंगाल: 77.57%
महाराष्ट्रात या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान –
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
(maharashtra lok sabha election 2024 first phase voting in percentage)