मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो; हिंदी सक्तीच्या मुद्यावरून ‘त्या’ भूमिकेचा केला उल्लेख

Ajit Pawa on MNS banner | राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ५ तारखेला ठाकरे बंधु गिरगाव येथून मोठा मोर्चा काढणार आहेत.
अशातच आज मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती नको, पाचवीपासून हिंदी भाषा असायला पाहिजे अशी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्याच व्यक्तव्याला दुजोरा देत या बॅनरद्वारे सरकारवर मनसेकडून ताशेरे ओढण्यात आले आहे.
बॅनरवर अजित पवारांची प्रतिक्रिया
या बॅनरमधून मनसेन अजित पवारांना राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे हा बॅनर मनसेचे मुंबई शहरचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लावलं आहे. संबंधित बॅनरवर अजित पवारांची प्रतिक्रिया छापली आहे. Ajit Pawar on MNS banner |
“इयत्ता पाचवी पर्यंत मुलांनी मातृभाषेतच शिकावं. इतर कोणत्याही भाषा शिकू नये. कोणत्याही भाषेला विरोध नाही. पण लहान वयात मुलांवर तीन भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यानंतर आता या बॅनरच्या माध्यमातून सरकारवर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. यावर आता अजित पवार काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Ajit Pawar on MNS banner |
हेही वाचा :





