Maharashtra Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ‘या’ उमेदवाराला देण्यात आला पहिला ‘एबी’ फॉर्म

मुंबई : राज्यात निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडी यांनी काही उमेदवार जाहीर केले आहेत तर आज परिवर्तन महाशक्तीने आपले ८ उमेदवार जाहीर केले. यादरम्यान अजित पवार गटाने उमेदवार जाहीर न करता थेट एका नेत्याला उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा ‘एबी’ फॉर्म दिला आहे.
‘या’ नेत्याला दिला ‘एबी’ फॉर्म
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचा अधिकृत पहिला एबी फॉर्म वितरित करण्यात आला असून भारत गावीत यांना हा एबी फॉर्म देण्यात आला आहे. भारत गावित हे नवापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक हे आमदार आहेत. 2019 ची विधानसभा निवडणूक ही भारत गावित यांनी भाजपाकडून लढवली होती आता यंदाची निवडणूक अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार आहेत.





