Voting for Malegaon elections : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज २२ जून २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने तीन पॅनेलमध्ये लढत होणार आहे. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या १९ हजार ५५१ इतकी आहे. यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मतदानाचा हक्क बजावणार का, याबाबत उत्सुकता कायम आहे. अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे, तुम्हाला काय त्रास आहे? मतदानाचा हक्का बजाविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकशाही पद्धतीने चालणारी निवडणूक आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मतदारांना आहे, तो ते पार पाडतील. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर चेअरमन पदाच्या उमेदवारीबद्दल अजित पवार म्हणाले, मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे, तुम्हाला काय त्रास आहे? मी ३५ वर्ष इथे काम करतोय, असे मिश्किल उत्तर त्यांनी यावेळी बोलताना दिले. …..त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती येथील पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी होती, असा आरोप सहकार बचाव पॅनेलचे रंजन तावरे यांनी केला होता. यामुळे बारामतीतील वातावरण चांगलेच तापले होते. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बँक चौकशीच्या मागणी केली होती. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, कुणी काहीही मागणी केली, तर मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही. २४ जूनला निकाल सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क शंभुसिह महाराज हायस्कूल या ठिकाणी बजावला. यावेळी सहकार बचाव पॅनेल रंजन तावरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. २४ जूनला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : “राज्यात आम्ही महायुती म्हणून लढणार परंतु रायगडमध्ये…..”; भरत गोगावलेंचे आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठं विधान