Ajit Pawar : अजितदादांच्या सावलीसारखा सोबत राहणारा ‘योद्धा’ हरपला; तरडगावच्या सुपुत्राचा अपघातात करुण अंत
Ajit Pawar - फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील सन 2009 बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल विदीप जाधव यांचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

Ajit Pawar – फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील सन 2009 बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल विदीप जाधव यांचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
या घटनेमुळे तरडगाव गावासह फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.विदीप जाधव (Vidip Jadhav) हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.
कर्तव्यावर असतानाच आज सकाळी घडलेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून विदीप जाधव यांची ओळख होती. मुंबई पोलीस दलात त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावत अनेक वरिष्ठांचे व सहकाऱ्यांचे मन जिंकले होते.
गावातून शहरापर्यंत त्यांनी मिळवलेली प्रतिष्ठा आज सर्वांच्या आठवणींतून व्यक्त होत आहे.ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने जाधव कुटुंबाच्या सांत्वनासाठी धाव घेत आहेत. गावातील अनेकांनी “कर्तव्यावर असताना शहीद झालेला आपला भूमिपुत्र” अशा शब्दांत विदीप जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.विदीप जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी तसेच सेवानिवृत्त असलेले वडील आणि आई असा परीवार आहे.
विदीप जाधव हे २००९ मधे मुंबई पोलीस म्हणून भरती झाल्यानंतर 2014 ते 2019 ते देवेंद्र फडणवीस यांचे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. २०१९ नंतर ते आजतागायत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते.






