Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन
Devendra Fadnavis : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

Devendra Fadnavis : देशभरात आज 77 वा प्रजासत्ताक मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. नुकतेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यांनी राष्ट्राला संबोधित करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील साकेत मैदानावर ध्वजवंदन केले आणि पुण्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. या कार्यक्रमाला मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. Devendra Fadnavis :
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने संविधानाचे महत्त्व आणि आर्थिक प्रगतीवर भर दिला. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून भारताच्या विकासाचे इंजिन आहे. आगामी काळात ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरेल. महाराष्ट्रातील आमचा शेतकरी सुखावला पाहिजे. या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली. शेतकरी अडचणीत आला त्या त्या वेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत सरकारच्या वतीने झाले. आता पुढच्या काळात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहेत.
आदिवासी अनुसुचित जातींकरिताही विकासाच्या विविध योजना केल्या जात आहेत. अशाप्रकारच्या विविध योजनांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून सुरु आहे. निश्चित येत्या काळात महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल,” असाही विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार
पुढे ते म्हणाले, “आपला महाराष्ट्र संतांची वीरांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये आज आपण देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र चांगलं काम करत आहे. नुकतंच दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहिल.
या गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम तर तो महाराष्ट्राच्या सर्व भागात आज गुंतवणूक येत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसह कोकण असो सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होतात. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम हे सरकारच्या माध्यमातून सुरु आहे,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा:





