Amit Shah On Ajit Pawar : “तक्रार अजित पवारांनी करायला हवी”; अमित शहा यांचा भाजप आमदारांना दमदार कानमंत्र

Amit Shah On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नाराज भाजप आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर तक्रारीचा पाढा वाचला. परंतु अमित शहा यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “उलट अजित पवारांनी तुमच्याविषयी तक्रार करायला हवी!”
नांदेडमध्ये झालेल्या एका बैठकीत, भाजप आमदारांनी अजित पवार हे मुद्दाम पक्षाच्या पराभूत उमेदवारांना पुढे आणतात, आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतात, असे सांगितले. यावर शहा यांनी भाजप आमदारांना न घाबरता कामाच्या आघाडीवर आक्रमक राहण्याचा सल्ला दिला.
ते म्हणाले, “आपली आमदारसंख्या जास्त आहे. मग मागे का हटायचं? प्रशासन आणि सरकार पातळीवर ताकदीने कामं लावा. महायुती म्हणून एकत्रच पुढे जायचं आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील या बैठकीत उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुकांवर भाजपचा फोकस
मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांमध्ये स्वबळावर लढण्याची शक्यता तपासत असल्याचे संकेत अमित शहा यांनी दिले. तसेच त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सखोल आढावा घेतला.
नेमकं काय घडलं?
2024 साली विधानसभा निवडणुकीत भाजपा आमदारांकडून पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचे काम मुद्दाम अजित पवार करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू पाहत आहेत.
तसेच भाजपा विरोधकांना ताकद देत आहे याकडे लक्ष द्यावे अशा तक्रारीचा पाढाच भाजपा आमदार तसेच मंत्र्यांनी अमित शाहंसमोर मांडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावर आपल्या आमदारांची संख्या अधिक,अशात मागे हटू नका…प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शाह यांनी आमदारांना सांगितले.





