अजित पवारांनी पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा; दोन दिवसांत पंचनामे करणार असल्याची दिली माहिती
Ajit Pawar | राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यातच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतेच राज्यभरातील पावसाच्या स्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
अजित पवार यांनी थोड्या वेळापूर्वीच मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.
याशिवाय अजित पवार यांनी ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यासह कार्यकर्त्यांना लोकांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पावसाच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.” Ajit Pawar |
आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पावसाच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तमाम मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 19, 2025
‘तातडीनं मदतकार्य आणि पंचनामे करून आवश्यक मदत उपलब्ध होईल’
“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तमाम मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या-त्यांच्या भागात पावसामुळे होणाऱ्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवावं. जिथे लोकांना अडचण होत आहे, तिथे स्वतः ग्राउंडवर जाऊन लोकांची मदत करावी. अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीनं मदतकार्य आणि पंचनामे करून लोकांना आवश्यक मदत उपलब्ध होईल, याची खात्री करून घ्यावी”; असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरू जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. Ajit Pawar |
तर माध्यामांसोबत संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेने सुट्टी जाहीर केली आहे. मिठी नदीची पाण्याची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या नागरिकांना सुरक्षित कसे नेता येईल, याबाबतचे नियोजन सुरू आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. सातारा, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिथेही अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात १० लाख एकर क्षेत्र पाण्याखाली आले आहे, तिथली पिके पाण्याखाली आली आहेत. दोन दिवसांत पंचनामे सुरू करण्यात येतील,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. Ajit Pawar |
हेही वाचा :





