Pune traffic jam : पावसाने केली पुणेकरांची दैना! सिंहगड रस्ता झाला जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवास कसा करायचा तुम्हीच सांगा?

Pune traffic jam : पुणे शहरात पावसाची संततधार अजूनही कायम आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झालं आहे. सोमवारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आजही सकाळपासून पावसाची संततधार कायम असून यामुळे पुणेकर वाहनधारकांना रस्त्यावरून मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत आहे.
सकाळपासून पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदीची स्वरुप आले आहे. सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे आता पुणेकर वैतागले आहेत. विठ्ठलवाडी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसाने रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनांची गती मंदावली असून त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
सिंहगड रस्ता हा पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज लाखो वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यातील खड्डे, पर्यायी रस्त्यांचा अभाव यामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहे. शहरातील वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, कात्रज आणि नगर रोड परिसरात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सिंहगड रस्ता जाम
सिंहगड रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे अद्याप लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे वाहतुकीचा ताण अजूनही इतर रस्त्यांवरच वाढताना दिसत आहे. विश्रांती चौक ,सिंहगड रोड येथे नवीन उड्डाण पूल येथे पालिकेने अचानक डिव्हायडरचे काम सुरू केल्याने संपूर्ण सिंहगड रोड जाम झाला आहे. याबाबत काम न करण्याचे सूचना मनपा इंजिनिअर यांना दिल्या आहेत.
हेही वाचा : Thama Movie | रश्मिका मंदानाचा दमदार लुक; ‘थामा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित





