Ajit Pawar on Devendra Fadanvis – सध्या कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .प्रत्येकाने गुटखा, तंबाखू, सिगारेट, बिडी, दारू आधी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. असा सल्ला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामतीत बोलताना दिला. ‘माणसाला आयुष्यात एकदा जीवन मिळत असतं.. आपल्याला आई-वडिलांनी जन्म दिल्यानंतर व्यसनाच्या आहारी न जाता आपण आपला आयुष्य सार्थकी लावले पाहिजे.’ असे पवार म्हणाले. ( Ajit Pawar on Devendra Fadanvis )
शिंदे गटात आणखी 3 खासदार आणि 5 आमदार सामील होणार; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट
विरोधी पक्ष नेते अजित पवार दोन दिवसापासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर त्यांचे बारामती शहरात विविध कार्यक्रम आहेत.. येथील एका कार्यक्रमात वरील वक्तव्य पवारांनी केले. व्यसन करणाऱ्यांचा मला तिटकारा आहे. असे सांगून पवार म्हणाले की, माझे सहकारी तंबाखूचे व्यसन करीत होते. त्यांना मी वेळोवेळी भर सभेतही बोललो.. आज ते माझ्या बरोबर नाहीत.. असे म्हणत त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचा उपस्थितांना सल्ला दिला.
जनावरांच्या दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी काहीजण पशुखाद्यात मानवी आरोग्याला अपायकारक असणाऱ्या असणाऱ्या घातक घटकाची गोळी करून जनावरांना चारत असल्याची माहिती माझ्यापर्यंत आल्याचे पवार यांनी सांगितले..तसेच पिकांवर फळांवर औषध फवारणी करीत असताना मानवी आरोग्यास धोका होणार नाही. यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन ही यावेळी अजित पवारांनी केले. ( Ajit Pawar on Devendra Fadanvis )
आईला भेटायला जातो,पण फोटो काढत नाही…
बारामती बँकेच्या वेगवेगळ्या ठीकाणी शाखा सुरु होत आहेत.त्यावेळी बँकेत नोकरी लागण्याची वेळ येते.त्यावेळी नोकरीसाठी बँकेत संधी मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे आईवडील,पालक येतात.दहा वर्ष माझा मुलगा,सुन,जावई बारामती सोडुन राहिले आहेत.त्यांना येथे आणण्यासाठी आग्रह धरला जातो.त्यांना येथे आणा…आणा…आणा.मात्र, येथे जागा शिल्लक नाहि..नाहि…नाहि.तुम्ही मला काटेवाडीतून मुंबईला पाठविले.मी कधी रडतो का,इथे यायचय…यायचय…अशा पध्दतीने यमक जुळवत मिश्कील टीप्पणी अजित पवार यांनी केली. आईला भेटायला जातो,पण फोटो काढत नसल्याचा देखील टोला विरोधी पक्षनेते पवार यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता लगावला.
शिवेंद्रराजे, तुम्ही सांगितल आणि आम्ही कधी ऐकले नाही अस झालय का ? – देवेंद्र फडणवीस
एक जिल्हा सांभाळताना नाकीनऊ यायचे, सहा सहा कसे संभाळणार..
एक जिल्हा सांभाळताना नाकीनऊ यायचे, सहा सहा कसे संभाळणार असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. एक व्यक्ती सहा जिल्हे कसे सांभाळणार असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हांची जबाबदारी आहे. पुण्याच्या पालकमंत्री असताना माझे नाकीनऊ यायचे असे अजित पवार म्हणाले. ( Ajit Pawar on Devendra Fadanvis )
बैलपोळ्या निमित्त अजित पवारांच्या हटके शुभेच्छा…
चावट चावट चांगभलं… असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.. आपले जे सण आहेत..ते साजरे केले पाहिजेत..एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजे ही आपली परंपरा आहे..संस्कृती आहे. वडीलधाऱ्यांनी दिलेली ती आपल्याला शिकवण आहे.. यात कुठेही खंड पडू द्यायचा नाही.
सोनाली फोगट हत्या प्रकरणात भाजपचा बडा नेता अडकण्याची शक्यता; भावाने केला खळबळजनक आरोप