अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर; ‘ते’ अठरा चेहरे कोण?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी आज पक्षाच्या प्रथम अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
या पहिल्या यादीत १८ उमेदवारच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ही यादी महापालिकेच्या विविध प्रभागांसाठी आहे आणि पक्षाने स्थानिक नेत्यांना प्राधान्य देत मजबूत उमेदवारांची निवड केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्पष्ट केले आहे की, ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार असून, महायुती किंवा इतर कोणत्याही आघाडीशिवाय शहरातील जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून प्रचार केला जाईल.
जाहीर झालेल्या उमेदवारांची यादी (प्रभाग क्रमांकानुसार):
प्रभाग क्रमांक ८ – डॉ. चारुलता सुनील मगरे
प्रभाग क्रमांक १२ – अजिज खान गणी खान
प्रभाग क्रमांक १३ – तुषार रामचंद्र सुराशे
प्रभाग क्रमांक ६ – हेमंत गोविंदराव देशमुख
प्रभाग क्रमांक ९ – अब्बास मैदू शेख
प्रभाग क्रमांक ९ – विशाल ओमप्रकाश इंगळे
प्रभाग क्रमांक ९ – फरीन अफसर पटाण
प्रभाग क्रमांक १४ – डॉ. मयुर मोहनराव सोनवणे
प्रभाग क्रमांक १५ – सौ. विशाखा अनिकेत निलवार
प्रभाग क्रमांक १६ – मोहम्मद ईसा मोहम्मद शरिफ कुरेशी
प्रभाग क्रमांक १९ – उल्हास वसंतराव नरवडे
प्रभाग क्रमांक २१ – अंकिता अनिल विधाते
प्रभाग क्रमांक २२ – मोरे ज्योती राजाराम
प्रभाग क्रमांक २२ – सुदाम धोंडीबा साळुंके
प्रभाग क्रमांक २२ – विशाल बाबासाहेब पुंड
प्रभाग क्रमांक २३ – दत्तात्रय सुंदरराव भांगे
प्रभाग क्रमांक २६ – फिरोज पेल
प्रभाग क्रमांक २८ – पल्लवी उत्कर्ष पल्हाळ
सोलापुरात शिवसेना-राष्ट्रवादीची युती
रविवारी एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत महापालिकेसाठी युती करण्याचे घोषित केले. शिंदेसेना व अजित पवार पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा रविवारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत केली. यावेळी दोन्ही पक्षांकडून महापालिकेच्या १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठा भाऊ छोटा भाऊ असा भेदभाव न करता दोन्ही पक्षांनी निम्या जागा वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे.





