महायुतीच्या विजयी आघाडीवर अजित पवारांची केवळ तीन शब्दांत प्रतिक्रिया ; काय म्हणाले वाचा ?

Ajit Pawar first reaction । राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतील पुन्हा सत्तेत येण्याची संधी दिली आहे. कारण एकट्या भाजपा पक्षाला 100 पेक्षा अधिक जागा मिळत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता महायुती राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, महायुतीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी या विजयी आघाडीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एका ट्विटमध्ये फक्त तीन शब्द Ajit Pawar first reaction ।
राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर अजित पवार यांनी एक्स या समाजमाध्यांवर एक ट्विट केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताना एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अजित पवार यांच्या हातात गुलाबी रंगाचे पुष्पगुच्छ आहे. या फोटोसोबत त्यांनी तीन ओळींचे खास कॅप्शन दिले आहे. महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
Maharashtra Chooses Pink 🙏🏻#MaharashtraElectionResult pic.twitter.com/0LqcGWwh3A
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 23, 2024
निकालानंतर अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत अजित पवार यांनी गुलाबी रंगाचा वापर करत प्रचाराचा धुरळा उडवला होता . त्यानंतर आज त्यांनी केलेलं ट्विट देखील सूचकच असल्याचे दिसून येत आहे.
गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचा वापरAjit Pawar first reaction ।
या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान, अजित पवार यांनी प्रचारासाठी खास रणनीती आखली होती. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तसेच त्यांच्या प्रचारयात्रेत गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचा वापर करण्यात आला होता. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी प्रचारमोहिमेसाठी गुलाबी रंगाचा वापर केला होता. त्यामुळेच आता अजित पवार यांनी महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असं ट्विट केलं आहे.





