Ajit Pawar : उद्या अजित पवारांच्या घरी होणार भाऊबीज कार्यक्रम; सुप्रिया सुळे राहणार उपस्थित

Ajit Pawar In Baramati : बारामतीतील गोविंद बागेत दरवर्षी प्रमाणे यंदा देखील दिवाळी साजरी करण्यात येत आहे. यासाठी सर्व पवार कुटुंबीय एकत्र येत असतात. मात्र यंदाच्या या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच अजित पवार यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र असे असताना अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, असे असताना अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत.
राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज गोविंदबागेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले असताना बारामतीत असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार तिकडे गेले नाहीत. परंतू, थोड्याच वेळात अजित पवार काटेवाडीत दिवाळीनिमित्त सजविलेले किल्ले पाहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे अजित पवार यांनी गोविंद बागेतील पाडवा टाळून पवार कुटुंबात दुफळी पडल्याचेच दाखवून दिले काय, अशी चर्चा आहे. मात्र, असे असले तरी उद्या काटेवाडीत होणाऱ्या भाऊबीजेला जाणार आहेत. या घरगुती कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
मात्र, असे असले तरी पाडव्यानंतर पवार कुटुंबीयांची भाऊबीज ही काटेवाडीत येथे अजित पवार यांच्या घरी असते. या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतात. अजित पवार यांनी आज दिवाळी पाडव्याला अनुपस्थित राहिले असले तरी खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपण काटेवाडीत भाऊबीजेला जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी राजकीय भूमिका वेगळी आणि कौटुंबिक संबंध वेगळे असे अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यानुसार सुळे या उद्या काटेवाडीत भाऊबीजेला जाणार आहेत. तसेच, शरद पवार उद्या काटेवाडीत उपस्थित राहणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे.





