Ajit Pawar: “अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही”, त्यामागचं कारण काय?
Ajit Pawar : अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. मात्र एक अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नसल्याचे त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी सांगितले आहे.
अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आल्याने, आता यापुढे कोणताही वेगळा विधी केला जाणार नसल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. Ajit Pawar
अजित पवार यांचा ६ फेब्रुवारी रोजी दशक्रिया विधी होणार होता. मात्र कुटुंबियांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता दहावा आणि तेराव्याचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नसल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितल्याचे वृत्त समोर आले आहे. Ajit Pawar
राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अलीकडेच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
याशिवाय सुनेत्रा पवारांकडेच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं, अशी मागणी पक्षातील आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.याचदरम्यान, प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.
हेही वाचा :
Dhurandhar 2 Teaser Release : रणवीर सिंहचा रौद्रवतार! धुरंधर 2 चा जबरदस्त टीझर रीलीज






