अजित पवार यांची कबुली म्हणाले,’बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती’

Ajit Pawar । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजय अशी निवडणूक पार पडली. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना यश मिळाले तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. अशात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेव्हा माझी चूक झाली असं म्हणत कबुली दिली आहे.
अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक होती. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली पवार यांनी दिली.
दरम्यान,रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे.





