“ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे नुकसान झालेला एक तरी फोटो दाखवा…” ; अजित डोभाल यांनी दिले थेट आव्हान

Ajit Doval on Pakistan। जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशहतवादी हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून बदल घेतला. मात्र याच ऑपरेशनवरून विरोधकांनी सरकारला घेरले असल्याचे दिसून आले. विरोधकांनी पाकिस्तानने भारताचे अनेक लढाऊ विमाने पडल्याचा दावा केला होता. तसेच पाकिस्तनाकडून देखील यावर अनेक विधाने समोर आली होती. दरम्यान आता याच विरोधकांच्या आणि पाकच्या दाव्याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी थेट आव्हान दिले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरवर एक विधान दिले आहे. त्यांनी याविषयी बोलताना पाकिस्तनाला थेट आव्हान देत,”जर भारताचे नुकसान झाले आहे तर त्याचा एकतरी फोटो मला दाखवा” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी या ऑपरेशन दरम्यान भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही असा मोठा दावा देखील केला आहे.
मला असा एक फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचे नुकसान झाले Ajit Doval on Pakistan।
डोवाल यांनी आयआयटी मद्रास याठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात,”परदेशी माध्यमांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. मला असा एक फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचे नुकसान झाले आहे. या दरम्यान भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही.” असा दावा केला.
यावेळी डोवाल म्हणाले की, “तंत्रज्ञान आणि युद्ध यांच्यातील संबंध नेहमीच महत्त्वाचा असतो. आम्हाला ऑपरेशन सिंदूरचा अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही या ऑपरेशन दरम्यान स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही सीमेपलीकडे असलेल्या नऊ पाकिस्तानी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी सीमावर्ती भागात एकही तळ नव्हता. आमचे सर्व लक्ष्य अचूक होते. आम्ही फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.’ अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
परदेशी माध्यमांनी अनेक चुकीच्या गोष्टी सांगितल्या Ajit Doval on Pakistan।
पुढे बोलताना त्यांनी,”ही संपूर्ण कारवाई २३ मिनिटे चालली. मला असा एक फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचे नुकसान झाले आहे. एकही काच फुटली नाही. परदेशी माध्यमांनी अनेक गोष्टी सांगितल्या. काही निवडक छायाचित्रांच्या आधारे त्यांनी पाकिस्तानच्या १३ हवाई तळांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पण १० मे च्या आधी आणि नंतर पाकिस्तानच्या १३ एअरबेसचे सॅटेलाईट फोटो पहा. सर्व काही स्पष्ट होईल.” असे स्पष्टपणे त्यांनी यावेळी सांगितले.
२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ७ मे च्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या अंतर्गत, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे उडवून दिले. यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानी सैन्याने भारताच्या लष्करी आणि नागरी अड्ड्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. चार दिवस चाललेल्या लष्करी चकमकीनंतर, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये ‘युद्धविराम’ झाला.
पाकिस्तानने या युद्धविरामासाठी भारताशी एकदा नाही तर दोनदा संपर्क साधला. पाकिस्तानने ७ मे च्या संध्याकाळी पहिल्यांदाच युद्धविरामासाठी भारताशी संपर्क साधला. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) कडून भारताशी औपचारिक संदेश पाठवण्यात आला. ७ मे च्या लष्करी कारवाईत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर, १० मे रोजी दुपारी ३.३५ वाजता डीजीएमओ स्तरावरील चर्चा झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली. हा करार दोन्ही देशांच्या लष्करी संपर्क माध्यमांद्वारे करण्यात आला, ज्याचा उद्देश तणाव कमी करणे होता.





