Rahane Commentary Debut : “आता खेळ वेगळ्या नजरेने पाहणार…”; गाबा जिंकवणाऱ्या अजिंक्य रहाणेचा १५ ऑगस्टपासून नवा प्रवास सुरू!
Rahane Commentary Debut : अजिंक्य रहाणे क्रिकेटच्या मैदानावरून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये दार्पण करत आपली नवी इनिंग सुरू करणार आहे.

Ajinkya Rahane Commentary Debut IND vs SL Test Series Sony Sports Network : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आता मैदानाबाहेर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. रहाणे क्रिकेटच्या मैदानावरून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये (Commentary Box) पदार्पण करत आपली नवी इनिंग सुरू करणार आहे. १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’ (Sony Sports Network) आणि ‘सोनी लिव्ह’च्या (Sony LIV) अधिकृत कॉमेंट्री पॅनेलचा भाग असणार आहे.
१८ वर्षांच्या शानदार कारकिर्दीनंतर नवा प्रवास!
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणापासून तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर ३७ वर्षीय रहाणेने क्रिकेटला अलविदा केला. त्याने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा कुटल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १२ शतके आणि २६ अर्धशतकांची नोंद आहे. मध्यक्रमाचा सर्वात विश्वासू फलंदाज म्हणून त्याने भारतीय संघाच्या अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गाबा कसोटीतील ऐतिहासिक विजयाचा नायक!
🎙️ A New Chapter for Rahane!
Ajinkya Rahane is set to make his Test commentary debut during the upcoming India 🇮🇳 vs Sri Lanka 🇱🇰 series! 🏏🎙️
From leading India on the field to sharing his insights behind the mic — a new innings begins! 👏🔥#AjinkyaRahane #SLvIND #TeamIndia pic.twitter.com/K0e2ICnfDk
— SportsTiger (@The_SportsTiger) August 12, 2026
२०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचा रहाणे हाच काळजीवाहू कर्णधार होता. आता तोच आपला प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय अनुभव कॉमेंट्रीच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवणार आहे.
आपल्या या नव्या प्रवासाबाबत बोलताना रहाणे म्हणाला, “भारत-श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान कॉमेंटेटर म्हणून पदार्पण करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इतके वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.” तो पुढे म्हणाला की, खेळातील सूक्ष्म बारकावे, रणनीती आणि महत्त्वाचे निर्णय चाहत्यांना सोप्या भाषेत समजवून सांगण्याचा त्याचा प्रयत्न असेल.





