अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता अजय देवगण हे बॉलीवूडचे एक असे जोडपे आहेत ज्यांना 90 च्या दशकापासून मोठ्या पडद्यावर लोकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. लवकरच प्रदर्शित होणारा ‘औरों में कहां दम था’ हा या जोडीचा 10 वा चित्रपट असेल. सध्या हे कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे. या दरम्यान तब्बूने अजयसोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीवर आणि त्याच्या सोबतच्या बॉण्डिंग बाबत तिने मत सांगितलं आहे. तब्बूने सांगितले की, अजय व्यतिरिक्त, तिने काम केलेल्या सर्व पुरुष कलाकारांसोबत तिची केमिस्ट्री सारखी नाही. अजयसोबत तिचे ‘वेगळे नाते’ आहे. तब्बू म्हणाली, ‘मी अजयला १२-१२ वर्षांची असल्यापासून ओळखते. तो माझ्या भावाचा बालपणीचा मित्र आहे. त्यामुळे आम्ही जवळपास एकत्रच वाढलो. म्हणूनच मी त्याला चित्रपटांमधून ओळखत नाही. मी त्याला खूप दिवसांपासून ओळखतो.’ अजय कसा होता हे सांगताना तब्बू म्हणाली, ‘तो लहानपणापासून असाच आहे. मला त्याच्यात फारसा बदल दिसत नाही. त्याला सिनेमाची खूप आवड आहे. अजयला लहानपणापासूनच दिग्दर्शक व्हायचं होतं त्याला कधीही अभिनेता व्हायचे नव्हते. तो व्हिडीओवर लघुपट बनवत असे.’ वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटानंतर अजय देवगण सिंघम अगेनमध्ये दिसणार आहे. तर तब्बू या वर्षी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ती क्रू या चित्रपटात दिसली होती. यावेळी ती नीरज पांडे दिग्दर्शित आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या रोमँटिक थ्रिलर और में कहाँ दम था मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.