राफेलवर लिंबू -मिरची लावून अजय राय यांनी उडवली खिल्ली ; टीकेनंतर स्पष्टीकरण देत म्हणाले,”मी चेष्टा केली….”

Ajay Rai on Rafale । उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलबाबत दिलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाने त्यांच्या विधानावर निशाणा साधला आहे आणि त्यांच्यावर गंभीर मुद्द्यांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला आहे. ज्यावर आता अजय राय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडे करायचे आहेत. ज्यातून तुम्ही ज्या राफेलवर लिंबू आणि मिरची लटकवून आणली होती त्यातुन कारवाई करण्याची वेळ आली आहे. सरकारने दहशतवाद आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी.” ही मागणी करण्यासाठी मी हे केले असल्याचे त्यांनी म्हटले.
अजय राय यांनी, पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना उत्तर देण्याची आज योग्य वेळ आहे. मी राफेलवर लिंबू मिरची लावली नाही… त्यांचे संरक्षण मंत्री राफेल घेण्यासाठी गेले तेव्हा लिंबू मिरची लावत होते. मी फक्त त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला की आज देशातील लोकांना तुम्ही उभारलेल्या राफेलद्वारे दहशतवाद आणि दहशतवाद्यांवर प्रभावी कारवाई हवी आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह कुटुंबीय आणत आहेत यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. Ajay Rai on Rafale ।
#WATCH | Varanasi: On his statement, UP Congress President Ajay Rai says “…It is the time to give a reply to the ones who killed our people in Pahalgam…When the Defence Minister went to take delivery of Rafale, he hung lemon-chillies on Rafale. I just wanted to open his eyes… https://t.co/blgLpvyT34 pic.twitter.com/clTMIDAv4z
— ANI (@ANI) May 5, 2025
अजय राय यांच्या ‘या’ विधानावरून वाद Ajay Rai on Rafale ।
अजय राय यांनी यापूर्वी खेळण्यातील विमानाला राफेल असे संबोधून त्यावर लिंबू-मिरची लटकवून सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, “हे सरकार मोठमोठ्या गोष्टी करते, म्हणते की ते दहशतवाद्यांना चिरडून टाकेल. त्यांनी राफेल आणले आहे, पण ते हँगरमध्ये उभे आहेत, त्यांच्या अंगावर लिंबू आणि मिरच्या लटकत आहेत आणि देशाचे संरक्षण मंत्री त्यांना लिंबू आणि मिरच्या बांधत आहेत. दहशतवाद्यांवर, त्यांच्या समर्थकांवर आणि आश्रयदात्यांवर कारवाई कधी करणार? आयात-निर्यात थांबवल्याने कोणाला फायदा होत आहे आणि कोणाचे नुकसान होत आहे हे सर्वांनी शोधले पाहिजे.”
काँग्रेस नेत्याच्या या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस स्वतःच एक विनोद बनली आहे. राफेलवरून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही काँग्रेसला फटकारले होते. लक्षात ठेवा, असे विनोद करणाऱ्यांना न्यायालयात फटकारले जाते.





