लखीमपूर हिंसाचारप्रकरणी अजय मिश्रांनी राजीनामा द्यावा

मुंबई – लखीमपूर हिंसाप्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याआधीच लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
ही मागणी नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे. मलिक म्हणाले, उद्याच्या बंदमध्ये जनता सहभागी होईल आणि केंद्राच्या जुल्मी कारवाईचा निषेध करेल. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. मात्र, संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठी उभा आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या प्रकरणात हात असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर मिश्रा यांच्या मुलाला अटक झाली. गृहराज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले. त्यामुळे मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहिजे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा तातडीने घेतला पाहिजे, असे मलिक म्हणाले.





