ऐश्वर्या राय-बच्चनच्या कारला बसची धडक; अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Aishwarya Rai-Bachchan | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला मुंबईत बेस्ट बसने धडक दिली आहे. जुहू याठिकाणी असणाऱ्या अभिनेत्रीच्या निवास स्थानाजवळ तिची लग्झरी गाडी टोयोटा वेलफायरचा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या घटनेत कारचे कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही.
पापाराझींच्या पेजवरुन अपघातानंतरचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ऐश्वर्या च्या कारला मुंबईतील एका बसने धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिचे बॉडीगार्डही गाडीच्या आजुबाजूला दिसून आले, या घटनेमुळे रस्त्यावर काही वेळासाठी गोंधळ उडाला आणि गर्दीही जमली होती. Aishwarya Rai-Bachchan |
View this post on Instagram
ऐश्वर्या राय बच्चनचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड रस्त्यावर उतरले होते, थोडावेळ तपासणी केल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला आणि दोन्ही वाहने आपापल्या मार्गाने निघाली. बेस्ट बसने धडक दिली तेव्हा ऐश्वर्या गाडीत उपस्थित नव्हती आणि सर्व काही ठीक असल्याची प्रतिक्रिया तिच्या मॅनेजरने दिली आहे. मात्र अभिनेत्रीच्या गाडीच्या अपघाताचे वृत्त समोर येताच, तिचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहेत. Aishwarya Rai-Bachchan |
ऐश्वर्या राय अलीकडेच मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट 2’ मध्ये झळकली होती. सध्या ऐश्वर्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत आहे. Aishwarya Rai-Bachchan |
हेही वाचा :





