फक्त 1279 रुपयांमध्ये उड्डाण! एअर इंडिया एक्सप्रेसची स्वातंत्र्य दिनाची मेगा ऑफर

मुंबई : भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने ‘फ्रीडम सेल’ची घोषणा केली आहे. या विशेष ऑफर अंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर सुमारे ५० लाख जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशांतर्गत उड्डाणांसाठी भाडे १,२७९ रुपयांपासून, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ४,२७९ रुपयांपासून सुरू होत आहे.
१५ ऑगस्टपर्यंत बुकिंगची संधी
एअरलाइनच्या निवेदनानुसार, या सेल अंतर्गत १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील प्रवासासाठी १५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करता येईल. “देशांतर्गत उड्डाणांसाठी १,२७९ रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ४,२७९ रुपये यापासून भाडे सुरू आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
१० ऑगस्टपासून सेल सुरू
ही ऑफर १० ऑगस्टपासून एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकृत वेबसाइट (www.airindiaexpress.com) (www.airindiaexpress.com) आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान ही ऑफर सर्व प्रमुख बुकिंग चॅनेलवरही उपलब्ध असेल. या योजनेंतर्गत प्रवास १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत करता येईल.
5 million seats on offer this #FreedomSale! 🎉Celebrate the freedom to explore and create #MeaningfulConnections.
💺 Domestic fares from ₹1279
🌏 International fares from ₹4279
📅 Book by 15 Aug 2025 and travel till 31 Mar 2026#FlyAsYouAre and unlock member-exclusive perks… pic.twitter.com/6LLeBefKZO— Air India Express (@AirIndiaX) August 9, 2025
विविध श्रेणींची तिकिटे उपलब्ध
‘फ्रीडम सेल’मध्ये प्रवाशांच्या गरजेनुसार विविध प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत:
एक्सप्रेस लाइट: यात चेक-इन बॅगेजचा समावेश नाही, ही सुविधा केवळ एअरलाइनच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
एक्सप्रेस व्हॅल्यू: यात मानक चेक-इन बॅगेजचा समावेश असून, देशांतर्गत मार्गांसाठी १,३७९ रुपये आणि आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी ४,४७९ रुपयांपासून भाडे सुरू आहे.
एक्सप्रेस बिझ: बिझनेस क्लाससारखी सुविधा, ज्यामध्ये ५८ इंचांपर्यंत सीट पिच आहे, ही सुविधा आता ४० हून अधिक नवीन विमानांमध्ये उपलब्ध आहे.
या सेलद्वारे प्रवाशांना स्वस्त आणि सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी एअर इंडिया एक्सप्रेसच्या वेबसाइटला भेट द्या.





