Rahul Gandhi : राहुल गांधी बसलेल्या विमानाचा मोठा अपघात टळला; एअर इंडियाच्या विमानाला ‘गो-अराउंड’
Rahul Gandhi : लखनऊ विमानतळावर एअर इंडियाच्या AI-1717 विमानाला अनस्टेबल एप्रोचमुळे गो-अराउंड करावे लागले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षित उतरले.

Rahul Gandhi : दिल्लीहून लखनऊला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 विमानाला लखनऊच्या अमौसी विमानतळावर लँडिंगपूर्वी गो-अराउंड करावे लागले. विमानाचा एप्रोच अनस्टेबल असल्याने पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने पहिल्या प्रयत्नातील लँडिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विमानातून काँग्रेस नेते राहुल गांधीही प्रवास करत होते.
विमानाला पुन्हा उंचीवर नेण्यात आले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंगसाठी एप्रोच घेण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नात AI-1717 विमानाची लखनऊ विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाली. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित असल्याची माहिती आहे.
गो-अराउंड म्हणजे काय?
विमान लँडिंगसाठी योग्य स्थितीत नसल्याचे पायलटच्या लक्षात आल्यास गो-अराउंड केला जातो. अशा वेळी विमान पुन्हा उंचीवर नेऊन नव्याने लँडिंगचा प्रयत्न केला जातो. विमान वाहतुकीत ही एक सामान्य सुरक्षा प्रक्रिया मानली जाते.
दुपारी 2.20 वाजता दिल्लीहून उड्डाण –
AI-1717 विमानाने दिल्लीहून दुपारी सुमारे 2.20 वाजता उड्डाण केले होते. हे विमान सुमारे 3.30 वाजता लखनऊला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नात अनस्टेबल एप्रोच झाल्याने गो-अराउंड करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातही घटना –
दरम्यान, 7 सप्टेंबर रोजी एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX415 या बोईंग 737 विमानाला इंजिनशी संबंधित अडचणीचा सामना करावा लागला. कोच्चीहून अबू धाबीला जाणाऱ्या या विमानाच्या इंजिन-1 मधील ऑईलची पातळी सुमारे 36 हजार फूट उंचीवर असताना वेगाने कमी झाली. पायलटांनी इंजिन बंद करून विमान कोच्चीला परत आणण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षित उतरले असून प्रवाशांना दुसऱ्या विमानाने अबू धाबीला पाठवण्यात आले.





