Air India Express : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला 10 तास उशीर

पुणे : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (आयएक्स-1176) उड्डाणातील प्रवाशांना त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागले. या प्रवाशांना विमानातून उतरण्यापूर्वी साडेसात तासांहून अधिक काळ विमानातच बसून रहावे लागले. तसेच त्यांना नव्याने सुरक्षा तपासणीस सामोरे जाण्यास सांगण्यात आले.
मूळतः दिल्लीहून शुक्रवारी रात्री ९:४० वाजता निघून पुण्यात रात्री ११:५० वाजता पोहोचणारहोती. या फ्लाइटला लक्षणीय विलंब झाला. अखेरीस शनिवारी सकाळी साडेसात वाजता सदर विमान सुटले. म्हणजेच या विमानाला एकूण नऊ तास उशीर झाला. पुण्यातील रहिवासी असलेल्या कुशल खंडेलवाल या प्रवाशाने आपली निराशा व्यक्त करताना सांगितले की, अनेक तक्रारी करूनही, एअर इंडिया एक्स्प्रेसने आम्हाला वविमानातून उतरवण्याची कोणतीही तसदी घेतली नाही.
उलट आम्हाला तासन्तास फ्लाइटमध्येच ठेवण्यात आले. या प्रवाशांना लांबलचक प्रतीक्षेदरम्यान चहा किंवा कॉफी सारख्या मूलभूत अल्पोपहारासाठी पैसे देण्यास सांगण्यात आले. विमानात वृद्ध लोक आणि मुले होती. तरीही त्यांना त्या दीर्घ तासांमध्ये एक कप चहा देखील विकत घेण्यास सांगितले गेले. विमान शेवटी सकाळी 10 वाजता पुण्यात उतरले. या विलंबाबद्दल प्रवासी एअर इंडियाकडे तक्रार करण्याच्या मनस्थितीत आहेत.





