ऐन दिवाळीत ‘एसटी’चा प्रवास महागणार; मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

ST Bus Tickets | ऐन दिवाळीच्या काही दिवसांआधीच एसटीचा प्रवास महागणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात 10 टक्के वाढ केली आहे. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेससाठी 25 ऑक्टोबरपासून दरवाढ लागू केली जाणार आहे.
एसटी महमंडळाने साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. एक महिन्यासाठी ही भाडेवाढ कायम राहणार आहे. हंगाम संपल्यानंतर 26 नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होणार आहे. सहा किलोमीटरचा एक टप्पा असल्याने त्यानुसार साध्या बसचे भाडे ८.७० रुपये आहे. त्यात दहा टक्के वाढ झाली असल्याने 9.55 रुपये म्हणजे 10 रुपये एका टप्प्यासाठी मोजावे लागणार आहेत. ST Bus Tickets |
10 टक्के भाडेवाढ
– साधी आणि जलदचे तिकीट सध्या प्रति टप्पा (६ किमी) ८.७० रुपये आहे. ते आता ९.५५ रुपये होईल.
– निमआराम, स्लिपर ११.८५ वरून १३.०५ रुपये होणार
– ई बसचे तिकीट सध्या १२.३५ रुपये आहे ते १३.६० रुपये होणार
– शिवाई व शिवशाहीचे तिकीट १२.३५ वरून १३.६० होणार
– शिवनेरीचे तिकीट १२.९५ वरून १४.२५ रुपये होणार .
‘शिवनेरी सुंदरी’ नेमणार
विमान प्रवासादरम्यान आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या एअर होस्टेज असतात. आता अशाच हवाई सुंदरी ई-शिवनेरी बसमध्ये देखील दिसणार आहे. एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्यात येणार आहे. एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत ही घोषणा केली. शिवनेरी सुंदरीची नेमणूक केल्यानंतरही शिवनेरीच्या बस तिकीटात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. ST Bus Tickets |
हेही वाचा:
झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई ; मनी लाँड्रिंग प्रकरणात 20 हून अधिक ठिकाणी छापे





