Pimpri : पिंपळे निलख, विशालनगर परिसरातील वाहतूक होणार सुरळीत

नवी सांगवी : पिंपळे निलख व विशाल नगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांच्या सौजन्याने विशेष प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून येथे आता महत्त्वाच्या चौकांमध्ये ट्रॅफिक वॉर्डन्स नियुक्त करण्यात आले आहेत. दि.१५ सप्टेंबर पासून या उपक्रमाचा शुभारंभ झाला असून, ट्रॅफिक वॉर्डन्स प्रत्यक्ष कार्यरत झाले आहेत. वाहतूक सुरळीत व शिस्तबद्ध करण्यासाठी हा उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी होणार आहे.
या त्यांच्या योजनेची मदत वाहतूक कोंडी सुधारण्याकरता नक्कीच होणार आहे. विशाल नगर पिंपरी निलख येथील नागरिकांनी स्वतः या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी प्रदीप पाटील (वाहतूक पोलीस निरीक्षक, सांगवी – वाकड विभाग), शिंदे साहेब (पिं.चिं. महानगरपालिका, ड प्रभाग स्थापत्य अधिकारी), भुलेश्वर नांदगुडे, राजाभाऊ मासुळकर, अशोक बालवडकर, संजय दळवी, काळूशेठ नांदगुडे, अनिल संचेती, आनंद कुंभार, अरविंद रणदिवे, नागेश जाधव, संजय पटेल, गोविंद गायकवाड, रवींद्र साठे, अशोक मेंगळे व परिसरातील सर्व मान्यवर व नागरिक उपस्थित होते





