Akhilesh Yadav : १२ डिसेंबरला अखिलेश यादव अयोध्येत; सह परिवार घेणार रामलल्लाचे दर्शन
या दौऱ्यादरम्यान अखिलेश यादव संत आणि महंतांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतील. सपा प्रमुख संतांसोबत प्रसाद ग्रहणही करतील.

Akhilesh Yadav – समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव १२ डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबासह अयोध्येला भेट देणार आहेत. तिथे ते राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतील.
सपा नेते आणि माजी मंत्री पवन पांडे यांनी अखिलेश यादव यांच्या अयोध्या भेटीची तारीख सांगितली. पवन पांडे यांच्या म्हणण्यानुसार, अखिलेश यादव यांच्यासोबत त्यांची पत्नी डिंपल यादव, मुलगा आणि मुलगी अयोध्येत असतील.
पांडे म्हणाले की, सपा प्रमुखांचा दौरा पूर्णपणे धार्मिक असेल. अखिलेश यादव संपूर्ण दिवस अयोध्येत घालवणार आहेत. राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर ते हनुमानगढीलाही भेट देतील.
या दौऱ्यादरम्यान अखिलेश यादव संत आणि महंतांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतील. सपा प्रमुख संतांसोबत प्रसाद ग्रहणही करतील.






