‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झाली आई; घरी चिमुकल्याचे आगमन

मुंबई – ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये अंकिताची भूमिका साकारलेली अभिनेत्री राधा सागरच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. आई झाल्याची आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्रीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राधाने तिच्या बाळाची झलक दाखवली आहे. राधाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘…आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण. आम्हाला मुलगा झाला हे. त्याच्या येण्याने आमच्या आयुष्यात एक वेगळा स्पार्क आला आहे. तो एखाद्या राजकुमारासारखा आहे. जीवनाच्या या नवीन मालिकेत आम्हाला आई आणि वडील म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद !!! आम्ही खरोखर धन्य पालक आहोत… राधासागर.’
View this post on Instagram
अभिनेत्री राधाने तिच्या गरोदरपनाचा संपूर्ण प्रवास तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी म्हणजे 27 मे 2023ला ती गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. ‘सगळ्यात चांगली बातमी देण्यासाठी सगळ्यात चांगला दिवस,’ असे तिने पोस्ट शेअर करत लिहिले होते. दरम्यान, राधा ‘आई कुठे काय करते’ या मालिकेसह ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती.





