अहमदनगर – रस्त्यांची झाली चाळण : वाहनचालकांची कसरत

नगर – शहरातील बऱ्याचश्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयात वाहनाचे चाक गेल्यानंतर संपूर्ण शरीराला जोरदार झटका बसतो. यामुळे अनेकांना पाठदुखी, मानदुखी व मणक्यांचे त्रास सुरु झाले आहे.
हल्ली प्रवास करणाऱ्यांमध्ये पाठदुधी व मानदुखी आजाराचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यामुळे म्हतारपणात होणारे त्रास आता तरुणांमध्ये सुद्धा वाढू लागले आहेत. उसण भरणे, सिर भरणातील गादी सटकणे नस दबणे अश्या अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. तेलीखुंट, सर्जेपुरा, कपडबाजार, सावेडी, तारकपूर या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावरून दररोज हजारे वाहने धावतात. जड वाहनांमुळे रस्ते लवकर खराब होतात. त्यामुळे महापालिकेने वेळच्यावेळी रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र, काम सुरू झाल्यानंतरही अनेक दिवस रस्त्यांचे काम रवडत आहे.
पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा खर्च परंतु रस्ते ‘जैसे थे वैसे’
नगर शहर व उपनगरात मिळून जवळपास साडेसातशे किलोमीटरचे रस्ते आहे. यातील बर्याचश्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. मात्र, रस्ते काही झाले नाहीत. नागरिकांना याच रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे.
हल्ली ज्येष्ठांसह तरुणांमध्येही पाठदुखी, मानदुखी व मणक्याच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, उसण भरणे, शिर भरणे, मणक्यातील गादी सटकणे, नस दबणे अश्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रस्त्यातील खड्ड्यात वाहनाचे चाक गेले की, शरीराला जोरदार डाटका बसतो, अशावेळी है दुखणे उद्भवण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रस्ता खराब असेल तर हळूवार वाहन चालवावे, तसेच नियमित व्यायाम व योगा करावा. त्रास जास्तच वाढला तर -तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करावा
– डॉ. ज्योती चोपडे,आयुर्वेद तज्ज्ञ





