अहमदनगर – ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा
Updated On:

नगर – देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, इम्पाचे जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, शिवाजी शेलार, संजय शिंदे, युसुफ शेख, त्रिंबक नेटके, सुरेश गायकवाड, योगी महाराज, नवनाथ गायकवाड,आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





