अहमदनगर । समीकरण जुळवण्यासाठी अंतरवाली सराटीत मुख्य धर्मगुरू यांची बैठक

जामखेड – विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पंधरा-वीस दिवसांपासून मराठा मुस्लिम, दलित समीकरण जुळवणे सुरू आहे. या संदर्भात अधिकृत माहिती ३१ ऑक्टोबर रोजी बैठकीत ठरणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा, मुस्लिम, दलित समाजाचे धर्मगुरू व मुख्य पदाधिकारी बोलावून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी उपस्थित राहणार आहे. मुस्लिम समाजाचे प्रमुख धर्मगुरु व इतर जबाबदार लोक महाराष्ट्र राज्यातून बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती ऑल इंडिया उलमा बोर्ड (रजी) चे महासचिव अंजर अनवर खान यानी दिली.
समीकरण जुळवणे अत्यंत आवश्यक आहे. एका जातीवर निवडणूक लढवली जात नाही. उमेदवारांनी अंतरवालीत येऊन गर्दी करू नये. मराठा, मुस्लिम, दलित हे एकत्र यायला पाहिजे मग राज्यात १००% परिवर्तन होऊ शकते. बरेच दिवसांपासून याचे प्रयत्न चालू होते, अशी माहिती ऑल इंडिया उलमा बोर्ड (रजी) चे महासचिव अंजर अनवर खान यांनी दिली.





