अहमदाबाद विमान दुर्घटना: आतापर्यंत १३५ मृतांचे डीएनए जुळले; १०१ मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द

Ahmedabad Plane Crash | एअर इंडिया विमान अपघातानंतर, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतांची डीएनए चाचणी केली जात आहे. रुग्णालयाचे अधीक्षक राकेश जोशी म्हणाले की, १२ जून रोजी झालेल्या अपघातानंतर आतापर्यंत १३५ जणांचे डीएनए जुळले आहेत. १३५ पैकी १०१ जणांचे अवशेष संबंधित कुटुंबांना देण्यात आले आहेत. जोशी म्हणाले की, इतर मृतांची ओळख पटविण्यासाठी पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.
या डीएनए टेस्टसाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना अहमदाबाद येथील रुग्णालयात पाचारण करण्यात आले. मग नखे, केस, हाडे अशा विविध गोष्टींमधून गुणसूत्र अहवाल मिळवण्यात आले. त्यानंतर त्या त्या मृतदेहाच्या शिल्लक अवशेषांशी हे नमुने जुळवण्यात आले. बहुतांश मृतदेह हे ओळखण्यापलिकडे भाजलेले असल्याने या मार्गाचा अवलंब करण्यात आला.
प्रवाशांमध्ये १६९ भारतीय
एअर इंडियाचे अत्याधुनिक विमान – बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर अहमदाबादच्या मेघनानीनगर येथे काही सेकंदातच कोसळले. विमानात २४२ जणांमध्ये १२ क्रू मेंबर्स होते. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. Ahmedabad Plane Crash |
अपघाताच्या वेळी मेघनानगरमध्ये उपस्थित असलेल्या अनेक लोकांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एअर इंडियाने प्रत्येकी १ कोटी २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. विमान का कोसळले याचा तपास सुरू आहे. त्यासाठी ब्लॅक बॉक्सच्या डेटाची तपासणी करण्यात येत आहे. Ahmedabad Plane Crash |
हेही वाचा:
अवघ्या २३ वर्षी मैथिली पाटीलला अखेरचा निरोप; स्वप्नांचा अंत अन् कुटुंबीयांचा आक्रोश





