Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, ही मदत ३० जूनपर्यंत वितरित केली जाणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सुरुवातीला या योजनेच्या अंमलबजावणीबाबत काहीसा संभ्रम होता, मात्र आता राज्यस्तरीय बँकर्स समितीचा अहवाल तयार झाल्याने प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. Farm Loan Waiver या अहवालानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यातील सुमारे २४.७३ लाख शेतकरी थकबाकीदार असून त्यांच्यावर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे, या कर्जमाफीत केवळ पीककर्जच नव्हे तर मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही समावेश असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. Farm Loan Waiver Farm Loan Waiver : अखेर प्रतीक्षा संपली..! कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची तारीख दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी कर्जमाफीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आल्याची माहिती दिली होती. या समितीच्या अहवालानंतरच पात्रता आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. राज्यातील सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, नांदेड, नागपूर, जालना, बीड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत जलद आणि पारदर्शक होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.