#हिवाळीअधिवेशन2022 : कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – दिलीप वळसे पाटील

नागपूर – विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्तगन प्रस्तावातंर्गत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे गायरान जमीन घोटाळा प्रकरण सभागृहात मांडले. यामधील चर्चेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गायरानच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने संपूर्ण देशासाठी 2011 मध्ये जजमेंट दिले आहे. या जमिनी कोणालाही विकता येणार नाही. असे असताना देखील कृषिमंत्र्यांनी गायरान जमीन एका खासगी व्यक्तिला दिली. हा विषय उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाने त्यावर ताशेरे ओढले आहेत.
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी स्तगन प्रस्तावातंर्गत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे गायरान जमीन घोटाळा प्रकरण सभागृहात मांडले. यामधील चर्चेत माजी गृहमंत्री @Dwalsepatil यांनी सहभाग घेतला. गायरानच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने संपूर्ण देशासाठी २०११ मध्ये जजमेंट दिले आहे. pic.twitter.com/egiShx4BI2
— NCP (@NCPspeaks) December 26, 2022
एखाद्या मंत्र्यावर ताशेरे ओढल्यावर या सभागृहाची पद्धत आहे की, त्या मंत्र्याला राजीनामे द्यावा लागतो. यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांना यामुळे राजीनामे द्यावे लागले आहेत, याचे स्मरण करून देत असे कृत्य केल्यानंतर सरकारने ताबडतोब या कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा.
त्याच्या विरोधात फौजदारी स्वरुपाचा खटला दाखल करून त्यांची चौकशी उपमुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात केली.





