पुणे जिल्हा | उत्रौली येथे कृषीविषयक मार्गदर्शन मेळावा उत्साहात
Updated On:

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – उत्रौली (ता. भोर) येथे कृषि संजिवनी पंधरवडानिमित्त कृषीविषयक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. भात आणि सोयाबीनची बीबीएफ यंत्राने पेरणी करणे. एमआरईजीएस फळबाग लागवड,पीएमएफएमई या मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यानी सहभाग घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.
कृषि विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच एक रुपयांमध्ये शासनाच्या वतीने दिला जाणारा विमा योजना माहिती देण्यात आली.या कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक डी. के. कवितके, कृषी सहाय्यक रोशन पवार,
अमृत मोहिते, वैभव कदम, उपसरपंच संतोष शिवतरे, कृषी मित्र अशोक शिवतरे, राजेंद्र भोईटे, केतन शेटे, रवींद्र शिवतरे, बाळासाहेब शेटे, संग्राम शिवतरे, राजेंद्र शेटे, अमोल शेटे, शुभम शिवतरे, दत्तात्रय शिवतरे ग्रामस्थ उपस्थित होते.





