अग्नितांडव! हैदराबादमध्ये भंगाराच्या गोडाऊला भीषण आग; ११ मजुरांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये भंगाराच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या भीषण आगीत आतापर्यंत ११ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या आगीत आणखी १२ मजूर अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ कामगार पहिल्या माळ्यावर झोपले असतानाच तळमजल्यावर गोडाऊनला आग लागली. यावेळी कामगारांकडे तेथून बाहेर पडण्यासाठी तळमजल्यावरुन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र शटर बंद होते असे सेंट्रल झोनचे डीसीपी राजेश चंद्रा यांनी सांगितलं आहे. एक कामगार स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Telangana | 11 people died after a fire broke out in a scrap shop in Bhoiguda, Hyderabad
Out of 12 people, one person survived. DRF reached the spot to douse the fire. A shock circuit could be the reason for the fire. We are investigating the matter: Mohan Rao, Gandhi Nagar SHO pic.twitter.com/PMTIDa5ilg
— ANI (@ANI) March 23, 2022
अग्निशमन दलाला पहाटे ३ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तब्बल तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवत होते. “एक कामगार इमारतीमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला असून त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” अशी माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त सी व्ही आनंद यांनी दिली आहे.
गोडाऊनमधील फायबर केबलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृत्यू झालेले अनेकजण हे स्थलांतरित कामगार असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “भंगाराच्या गोडाऊनमध्ये दारुच्या मोकळ्या बाटल्या, पेपर, प्लास्टिक, केबल अशा अनेक गोष्टी होत्या. पहिला माळा दुसऱ्या माळ्यासोबत जोडला होता. पहिल्या माळ्यावर दोन रुम होत्या. सर्व ११ मृतदेह एकमेकांच्या अंगावर पडलेले होते. मृतदेहांची ओळखही पटू शकत नाही इतके जळाले आहेत,” अशी माहिती पोलिसांनी दिली.





